‘प्रो गोविंदा’ला राष्ट्रीय मान्यता मिळवून एशियाड, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिकपर्यंत नेणार – मुख्यमंत्री

प्रोगोविंदालीग २०२६ सिझन ४ चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे पार पडला. गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून हा खेळ संपूर्ण भारतासह जगात पोहोचला आहे. गोविंदाच्या या साहसी खेळाला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न […]
‘प्रो गोविंदा’ला राष्ट्रीय मान्यता मिळवून एशियाड, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिकपर्यंत नेणार – मुख्यमंत्री
Will secure national recognition for ‘Pro Govinda’ and take it to the Asiad, Commonwealth, and Olympics – Chief Minister

प्रोगोविंदालीग २०२६ सिझन ४ चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे पार पडला. गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून हा खेळ संपूर्ण भारतासह जगात पोहोचला आहे. गोविंदाच्या या साहसी खेळाला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली प्रो गोविंदा लीग (पीजीएल) देशातील मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठीची पहिली व्यावसायिक लीग म्हणून ओळखली जाते.

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक अभिसरणाचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदांनी एकमेकांना आधार देत मानवी साखळी तयार करून हंडी फोडण्याची परंपरा जपली आहे. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला ‘संपूर्ण समाज एक आहे’ हा संदेश या खेळातून अधोरेखित होतो. एकीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आणि मोठे कार्य साध्य करता येते.यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व गोविंदा पथके, त्यांचे प्रशिक्षक तसेच गोविंदांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शायना एन. सी उपस्थित होते.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, दही – हंडी ( प्रो गोविंदा) खेळाला राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच शासन २०२३ पासून गोविंदांना विमा देत आहे. यावर्षी गोविंदांची संख्या वाढवून एक लाख ६० हजार गोविंदाना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी १६ संघ आणि ३२०० गोविंदांनी सहभाग घेतला असून, तीन दिवस या स्पर्धा सुरू रहाणार आहेत.