आदिवासी विद्यार्थ्यांच्या ॲनिमियावर प्रभावी उपाययोजना; ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी
आदिवासी विद्यार्थ्यांमधील ॲनिमिया (रक्तक्षय) समस्येचे प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासीविकास विभागामार्फत ‘ॲनिमिया निवारण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दीड महिन्यात राज्यातील २०३ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.
नाशिक विभागात ४१,४६९, ठाणे ३३,४२६, अमरावती २,८९८, नागपूर १,८३१ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून पुढील उपचार व पोषणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.” अशी माहिती आदिवासी विकास विभाग आयुक्त लीना बनसोड यांनी दिली.