
जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत पार पडली.
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ५६ निवडणूक विभागांपैकी आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीसाठी १ जागा, अनुसूचित जमातीसाठी ४४ जागा आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी ११ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
महिला आरक्षणाबाबत तपशील:
अनुसूचित जातीसाठी राखीव १ जागा मागील निवडणुकीत महिला राखीव असल्याने, यावेळी ती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली.
अनुसूचित जमातींच्या ४४ जागांपैकी २२ जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे सोडतीने आरक्षित करण्यात आल्या.
मागासवर्ग प्रवर्गातील ११ जागांपैकी ६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
सदर सोडतीची प्रक्रिया कुमारी स्वरा विजय कणखर (वय ६ वर्षे) हिच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, राजकीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे समारोप करताना महसूल उपजिल्हाधिकारी श्री. प्रमोद भामरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
ही संपूर्ण सोडत प्रक्रिया न्याय्य, पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने पार पडली असून, या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.
#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#महिलासक्षमीकरण#जिल्हापरिषदनिवडणूक#PanchayatElection#ReservationDraw#WomenEmpowerment#DistrictAdministration#TransparentGovernance#InclusiveDevelopment#SmartNandurbar#PrashasanAplyaDarbarat#NandurbarUpdates#LokshahiDin