मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार क्रांतिकारक बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय संस्थांचे प्रमुख तसेच खाजगी कृत्रिम रेतन करणारे आणि इच्छुक पदविकाधारक सहभागी झाले होते.
उद्दिष्ट्य: देशी गोजातींचे संवर्धन, नियोजित प्रजनन, दर्जेदार वंशवाढ, दुधोत्पादनात वाढ आणि शेतीउत्पन्नात भर!
डॉ. तुषार गीते (प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त) यांच्या नेतृत्वात या कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
अशा कार्यशाळांद्वारे शेतकरी आणि तज्ज्ञांमध्ये जनजागृती निर्माण होऊन, गोजाती संवर्धनाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जात आहे.
#गोजातीसंवर्धन#MaharashtraBreedingAct2023#AnimalHusbandry
#NandurbarUpdates#गायम्हैसप्रजनन#शेतीउत्पन्नवाढ#DistrictCollectorNandurbar