Home आरोग्य जागतिक मानसिक आरोग्य महिन्याचा समारोप — जिल्हा रुग्णालय नंदुरबारतर्फे जनजागृती व समुपदेशन...

जागतिक मानसिक आरोग्य महिन्याचा समारोप — जिल्हा रुग्णालय नंदुरबारतर्फे जनजागृती व समुपदेशन सत्राचे आयोजन

5
World Mental Health Month concludes — District Hospital Nandurbar organizes awareness and counseling session

(नंदुरबार) जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (District Mental Health Programme – DMHP), जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य महिना निमित्त विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा समारोप समुपदेशन सत्र व टेलीमानस हेल्पलाईनविषयी माहितीपर कार्यक्रमाने करण्यात आला.

या प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, समाजसेवक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, ताणतणाव व्यवस्थापन, आत्महत्येची प्रतिबंधात्मक काळजी, तसेच भावनिक स्थैर्य राखण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः टेलीमानस हेल्पलाईन क्रमांक – १८००८९१४४१६ याविषयी माहिती देण्यात आली. या हेल्पलाईनद्वारे नागरिकांना मोफत, गोपनीय आणि तत्काळ मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध होऊ शकते.

मानसोपचार विभागाच्या टीमने सांगितले की, ‘मानसिक आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याचा अविभाज्य भाग आहे. समाजाने मानसिक आजारांबद्दल असलेले गैरसमज दूर करून संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे.’

जागतिक मानसिक आरोग्य महिन्याच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम, शाळा व महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रे, तसेच रुग्णालयांमध्ये समुपदेशन शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

या उपक्रमातून ‘सुदृढ मन, सुदृढ समाज’ या संकल्पनेचा प्रसार करण्यात आला.

#Nandurbar#DistrictHospital#DMHP#MentalHealthAwareness#WorldMentalHealthMonth#TeleManas#DrMitaliSethi#MentalWellness#HealthAwareness#NandurbarCares