Home तळोदा मोड येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

मोड येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

25
World Tribal Day celebrated with enthusiasm at Mode
World Tribal Day celebrated with enthusiasm at Mode

(तळोदा) तळोदा तालुक्यातील मोड येथे विश्व जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम गावात मिरवणूक काढून याहा मोगी मातेची प्रतिमा तसेच विर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, संत गुलाम बाबा, संत रामदास महाराज ई. महापुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक वाजत गाजत साध्या पद्धतीने काढण्यात आली. त्यानंतर मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. व पारंपरिक तिरकामठा हातात घेऊन आपला पावित्रा दाखविला. (World Tribal Day celebrated with enthusiasm at Mode)

जागतिक आदिवासी दिवस : महत्त्व

याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सर्वांना समजून सांगितले. त्यानंतर चैतनेश्वर महादेव मंदिराचा प्रांगणात सर्व महिला पुरुषांची सभा घेण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच जयसिंग माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सुरुवातीला बिरसा मुंडा तसेच याहा मोगी माता त्याचप्रमाणे खाज्या नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सर्वांनी केले. सुरुवातीला राणाजी भिलाव यांनी आदिवासी भाषेत आदिवासी गौरव दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतरं आदिवासी संस्कृतीचा नियमानुसार धरती मातेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक फुंदिलाल माळी, खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन पुरुषोत्तम चव्हाण, ग्रा.सदस्य वसंत सोनवणे, गुलाबसिंग गिरासे, डॉ. पुंडलिक राजपूत इत्यादींनी आदिवासी गौरव दिनाबाबत सखोल माहिती दिली.

जागतिक आदिवासी दिवस : व्यसनमुक्तीच्या संदेश

अध्यक्ष भाषण जयसिंग माळी यांनी आदिवासी संस्कृती या आदिवासी दिनाला ज्यांना काही व्यसन असेल त्यांनी आजच्या दिवशी त्याचा त्याग करावा व व्यसनमुक्तीच्या संदेश द्यावा. त्याचप्रमाणे प्रत्येकाने शाळेत गेले पाहिजे. शैक्षणिक प्रगती ही प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मुलांना शाळेत पाठवले पाहिजे असे आव्हान केले. त्यानंतर त्यांनी मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. 

Jagtik Adiwasi Diwas celebrated  at Mode

यावेळी आमदार राजेश पाडवी, माजी सरपंच जयसिंग माळी, लोकनियुक्त सरपंच सविता गावित, ग्रामपंचायत सदस्य रणजीत वळवी, वसंत सोनवणे तापीबाई माळी, सुषमा ठाकरे, डॉक्टर पुंडलिक राजपूत, ग्रामस्थ राणाजी भिलावे, अजय भिलावे, माध्यमिक शाळेचे शिक्षवृंद व विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षवृंद व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर इत्यादी हजर होते. आदिवासी दिवस शांततेत पार पाडावा म्हणून तळोदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल, पोलीस दुरुक्षेत्राचे हवालदार गौतम बोराडे, विजय वसावे, निलेश खोंडे, राजू जगताप, छोटू कोळी, विलास पाटील, संदीप महाले इत्यादी पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.