Home नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 : नंदुरबारमध्ये मतदान यंत्रांची...

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 : नंदुरबारमध्ये मतदान यंत्रांची FLC प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत सुरू

3
Zilla Parishad and Panchayat Samiti General Election 2025: FLC process of voting machines in Nandurbar begins in the presence of District Collector Dr. Mittali Sethi

नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी (First Level Checking – FLC) प्रक्रिया आजपासून औपचारिकपणे सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या तळमजल्यावर सकाळी 10 वाजेपासून सुरू झाली असून, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतः भेट देऊन यंत्रांची तपासणी व निरीक्षण केले.

FLC प्रक्रियेत एकूण 1426 बॅलेट युनिट्स (BU) आणि 1049 कंट्रोल युनिट्स (CU) यांची तपासणी केली जात आहे. ईव्हीएम (मतदान यंत्र) या निवडणूक प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, ही तपासणी प्रक्रियेची सुरुवात विश्वसनीयतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

डॉ. मित्ताली सेठी यांनी FLC दरम्यान दिलेल्या सूचना:

⦁ मतदान यंत्र हाताळताना अत्यंत काळजी व नियमांचे काटेकोर पालन करावे.

⦁ कोणतीही यांत्रिक हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

⦁ FLC संदर्भातील राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करावे.

तपासणीदरम्यान ईव्हीएम यंत्रांची कार्यक्षमता, बटण तपासणी, स्क्रीन पडताळणी व सुरक्षिततेच्या दृष्टीने सखोल बारकाईने परीक्षण केले जात आहे.

मान्यवर उपस्थित अधिकारी:

⦁ श्री. प्रमोद भामरे – उपजिल्हाधिकारी, महसूल प्रशासन

⦁ श्री. संतोष डेरे – तहसीलदार

⦁ श्री. रमेश वळवी – नायब तहसीलदार

⦁ श्री. संदीप सोनवणे – निवडणूक शाखा अधिकारी

⦁ ITI तांत्रिक कर्मचारी, निवडणूक शाखेचे कर्मचारीवर्ग

ही संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडत आहे.

विश्वासार्ह निवडणुकीची सुरुवात – नंदुरबारचा आदर्श पुढे!

डॉ. मित्ताली सेठी यांच्या कार्यक्षम नेतृत्वात नंदुरबार जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यक्षमता व जनतेच्या विश्वासाला प्राधान्य देत आहे. FLC ही प्रक्रिया या दृढनिशयाचा पहिला टप्पा ठरतो आहे.

#NandurbarElection2025#EVMTesting#FLCProcess#DrMittaliSethi#ZPNandurbar#SmartElectionSystem#TransparentGovernance#DigitalNandurbar#SEC_Maharashtra#VotingReadyNandurbar