Home शैक्षणिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

0
33,281 students from the state have become scholarship holders in the scholarship examination.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या प्राथमिक (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यातील ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

इयत्ता चौथीसाठी १६ हजार ६९३, तर इयत्ता सातवीसाठी विविध संवर्गांतील १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी व प्रमाणपत्रे संबंधित शाळांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध करून दिली आहेत.

अंतिम निकाल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या, जिल्हानिहाय शाळा सांख्यिकी माहिती तसेच संवर्गनिहाय कटऑफ गुणांची माहिती https://mscepune.in आणि https://२०२६-२.puppssmsce.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. तथापि, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती भरल्यानंतरच उपलब्ध होईल.

मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षेस बसलेले विद्यार्थी, विहित वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी, शुल्क न भरलेले विद्यार्थी तसेच नियमानुसार पात्रता पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश नाही. ऑनलाइन अर्जामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पात्रता रद्द करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.