निती आयोगाच्या Aspirational Districts Programme अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधा सुरू करण्यात आली असून नंदुरबार शासकीय रुग्णालयात ‘ब्रेन हेल्थ क्लिनिक (मेंदू आरोग्य क्लिनिक)’ कार्यान्वित झाले आहे.
ही सुविधा मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून, ओजस भवसार जिल्हा समन्वयक, ब्रेन हेल्थ क्लिनिक, शासकीय रुग्णालय, नंदुरबार यांच्या समन्वयातून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
ब्रेन हेल्थ क्लिनिकचा मुख्य उद्देश:
1. मेंदू व मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांचे लवकर निदान
2. वेळेत उपचार
3. रुग्ण व नागरिकांमध्ये मेंदू व मानसिक जनजागृती
4. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत सुलभ, दर्जेदार व समन्वित उपचार सेवा पोहोचवणे
या उपक्रमामुळे मेंदू व मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांबाबत असलेली भीती, गैरसमज दूर होऊन उपचारासाठी पुढे येण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे.
ब्रेन हेल्थ क्लिनिकमधील प्रमुख सेवा:
१. न्यूरो-रिहॅबिलिटेशन (Neuro-Rehabilitation):
स्ट्रोक, पार्किंसन, मिर्गी, स्पाइनल इंजरी, ब्रेन इंजरी, मल्टिपल स्क्लेरोसिस, डोकेदुखी, चक्कर येणे, स्मृतीभ्रंश, डिप्रेशन, झोप न येणे, हात-पाय सुन्न होणे आदी आजारांवर उपचार व पुनर्वसन सेवा.
२.वैद्यकीय मानसोपचार (Psychiatry):
मानसिक आरोग्य वैद्यकीय तपासणी व औषधोपचार.
३.मानसशास्त्रीय समुपदेशन:
तणाव, चिंता, नैराश्य, भावनिक समस्या यावर समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन.
४.स्पीच थेरपी:
बोलण्यात अडचण येणाऱ्या रुग्णांसाठी विशेष उपचार.
५.फिजिओथेरपी:
मज्जासंस्था व हालचालींशी संबंधित अडचणींवर फिजिओथेरपी सेवा.
पत्ता:
२४, ब्रेन हेल्थ क्लिनिक,
शासकीय रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय इमारत, नंदुरबार
संपर्क क्रमांक:
02564 – 299411
ब्रेन हेल्थ क्लिनिकच्या सुरूवातीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना मेंदू व मानसिक आरोग्याच्या उपचारांसाठी आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. Aspirational Districts Programme अंतर्गत सुरू झालेली ही सुविधा जिल्ह्याच्या आरोग्य सेवांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणार आहे.
(Collector Office Nandurbar)
#BrainHealthClinic#mentalhealthawareness#civilhospitalnandurbar#PublicHealth#HealthcareForAll
















