Home नंदुरबार जिल्हा स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज योजना

स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज योजना

4
Low interest loan scheme for self-employment

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या शाखा कार्यालयामार्फत राज्य शासनाच्या सहाय्याने अल्प व्याजदरावर विविध व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हितेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शाखा कार्यालय, नंदुरबार येथे खालील योजनांसाठी लक्षांक प्राप्त झाला आहे :

• महिला सबलीकरण योजना: रुपये 2 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (26 लक्षांक).

• कृषी संलग्न व्यवसाय: रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (10 लक्षांक).

• हॉटेल/धाबा: रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (8 लक्षांक)

• ऑटो वर्कशॉप/स्पेअरपार्ट: रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (8 लक्षांक)

• वाहन व्यवसाय: रुपये 10 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (4 लक्षांक)

• लघु उद्योग: रुपये 3 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (8 लक्षांक)

• ऑटोरिक्षा/मालवाहू रिक्षा: रुपये 3 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (4 लक्षांक).

• बचत गट: रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (9 लक्षांक)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या loan.mahashabari.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची फाईल शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, शाखा कार्यालय, जुने प्रकल्प कार्यालय, धुळे चौफुली जवळ, नंदुरबार येथे जमा करावी, असेही शाखा व्यवस्थापक हितेश पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.