शेतकरी हिताला प्राधान्य, नवापूर तालुक्यातील 26 शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील

नवापूर(प्रतिनिधी):-शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त 26 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. या संदर्भातील क्षेत्रीय समितीची बैठक शुक्रवारी तहसील कार्यालय, नवापूर येथे शिरीषकुमार नाईक, अध्यक्ष, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रीय समिती तथा आमदार, नवापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या […]
शेतकरी हिताला प्राधान्य, नवापूर तालुक्यातील 26 शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील
Priority given to farmers' interests; green signal for 26 farm/access road projects in Navapur Taluka.

नवापूर(प्रतिनिधी):-शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त 26 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. या संदर्भातील क्षेत्रीय समितीची बैठक शुक्रवारी तहसील कार्यालय, नवापूर येथे शिरीषकुमार नाईक, अध्यक्ष, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रीय समिती तथा आमदार, नवापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत मंजूर कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे उच्च दर्जाची, पारदर्शक व विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार नाईक यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. निधीचा योग्य वापर करून प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व्हावे तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी कापसे, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार, शेतकरी प्रतिनिधी, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी तसेच क्षेत्रीय समितीचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे जाळे अधिक सक्षम होऊन शेतीमालाची वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: