
अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन नरहरी नातू यांनी समाजसेवेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. निवृत्तीनंतरही आपली सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना दरवर्षी १ लाख ११ हजार रुपयांचे मानधन देण्याचा संकल्प केला आहे.
गेल्या ११ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू असून, यासाठी ते स्वतःची मदत आणि २०० मित्रांच्या सहकार्याने हा निधी जमा करतात. व्यवसायातून निवृत्त झाल्यावरही सैनिकांच्या त्यागाला सलाम करणाऱ्या मोहन नातू यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#Ahilyanagar#SocialWork#Inspiration#IndianArmy#VeerPatni#SamajSeva#अहिल्यानगर#देशसेवा#प्रेरणादायी















