Home महाराष्ट्र कौशल्यविकास क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

कौशल्यविकास क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

0
The state government intends to bring about comprehensive changes in the skill development sector.

राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात पुढील दोन वर्षांत युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या अधिकच्या नव्या संधी निर्माण होतील. असा विश्वास व्यक्त करत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात कौशल्य विकासातून रोजगाराच्या नव्या संधीसाठी ३० लाख युवक-युवतींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.

विधानपरिषदकामकाज

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी नसून युवकांना कामाचा अनुभव (इंटर्नशिप) मिळावा हा तिचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

विधानपरिषदकामकाज

राज्यातील सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमार्फत दर्जेदार प्रवासी सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी विशेष उपक्रम, योजना राबविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधानपरिषदकामकाज

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी हमीभाव वाढ आणि खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती मंत्री संजय सावकारे यांनी विधानपरिषदेत दिली.

सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/194358/

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026