Home महाराष्ट्र जिल्हास्तरीय जनगणना प्रशिक्षणाचा समारोप

जिल्हास्तरीय जनगणना प्रशिक्षणाचा समारोप

0
District level census training concludes

अमरावती: जनगणना 2027च्या अनुषंगाने नियोजन भवनात जिल्हास्तरावरील तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षण वर्गाचा आज समारोप करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महापालिका उपायुक्त योगेश पिठे, सहआयुक्त विकास खंडारे, जिल्हा सूचना अधिकारी मनिषकुमार, अधिक्षक निलेश खटके, प्रशिक्षणाचे मार्गदर्शक जनगणना संचालनालाचे सहायक व्यवस्थापक प्रविण भगत, जिल्हा समन्वयक ऋषीकेश पाथरे, मास्टर ट्रेनर तहसिलदार मयूर कळसे, अक्षय मंडवे उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी जनगणना ही देशातील योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरत असते. त्यामुळे प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांनी अचूक नोंद घ्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी सोनल सुर्यवंशी, मनोज शहाळे, तांत्रिक सहायक चेतना चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशिक्षणासाठी जणगणना कक्षाच्या राधिका देशमुख यांनी सहकार्य केले. भावना जिचकार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.