
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मध्य रेल्वेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमधील बैठकीत झाला.मंत्रालयातील छगन भुजबळ यांच्या दालनात येवला तालुक्यातील गेट नंबर ७७,७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल (आरओबी) बांधकामांना मंजुरी देण्यासाठी बैठक पार पडली.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शरद राजभोज, मध्य रेल्वे रस्ते सुरक्षा आणि पूल निर्माण विभागाचे मुख्य अभियंता विनोद भंगाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता देवेंद्र पवार यांच्यासह मध्य रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.















