Home महाराष्ट्र अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

1
Take strict action against drugs - Resident Deputy Collector Dadasaheb Gite

अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठा व तस्करीवर कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी, तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले, “शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर देण्यात यावा. ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक बळकटी देण्यात यावी. पोलीस विभाग, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.”

जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ एप्रिल २०२६ दरम्यान अमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ प्रकरणांमध्ये १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लागवडीच्या प्रकरणातील २ गुन्ह्यांमध्ये ३ व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील ३ प्रकरणांमध्ये ८ व्यक्तींवर आणि अमली पदार्थ सेवनाच्या २६ प्रकरणांमध्ये ३२ व्यक्तींवर, अशा प्रकारे अमली पदार्थांच्या एकूण ४० प्रकरणांमध्ये ५५ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री. भोये यांनी यावेळी दिली.

#अमलीपदार्थविरोधी#AntiDrugCampaign#अहिल्यानगर#AhalyaNagar#कठोरकारवाई#DrugFreeIndia#पोलीसप्रशासन#PoliceAction#जनजागृती#AwarenessDrive#नार्कोकोऑर्डिनेशन#NCORD#महाराष्ट्रशासन#MaharashtraGovernment#व्यसनमुक्तभारत#SayNoToDrugs#जिल्हाधिकारीकार्यालय#CollectorOffice#सुरक्षितजिल्हा#PublicSafety