Home महाराष्ट्र माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

0
Arrival and welcome of former President Ram Nath Kovind at Ozar Airport

नाशिक : देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास ओझर विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी माजी राष्ट्रपती श्री. कोविंद यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, दिंडोरी-पेठ च उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.