Home महाराष्ट्र Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती आराखड्याचा...

Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती आराखड्याचा आढावा

1
“Mission 150” campaign gains momentum; Review of Health and Nutrition Action Plan for High Priority Villages

नंदुरबार जिल्ह्यात आज “Mission 150 – A Convergent Life Cycle Approach for 150 High-Burden Villages” अंतर्गत जिल्हास्तरीय कृती आराखडा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील उच्च प्राधान्य असलेल्या १५० गावांमध्ये आरोग्य, पोषण आणि माता-बाल विकास सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

👩‍⚕️ बैठकीमध्ये आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, RBSK तसेच विविध विभाग आणि विकास भागीदार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

📊 गावनिहाय बेसलाईन डेटा, प्रमुख KPIs (Key Performance Indicators), क्षेत्रीय भेटींचे नियोजन, मासिक आढावा यंत्रणा आणि सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डेटा-आधारित नियोजनाद्वारे प्रत्येक गावातील वास्तविक गरजा ओळखून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.

🤱 किशोरी, गर्भवती व स्तनदा माता तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी जीवनचक्र आधारित दृष्टिकोन स्वीकारण्यात येत असून, कुपोषण कमी करणे, मातृ व बाल आरोग्य निर्देशांक सुधारणे आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🏡 दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणा अधिक सक्षम करणे, समुदाय सहभाग वाढविणे आणि विभागीय एकत्रित कृतीद्वारे शाश्वत बदल घडवून आणण्यावर भर देण्यात आला.

🤝 “Mission 150” हा उपक्रम प्रशासन, विविध विभाग आणि विकास भागीदार यांच्या समन्वयातून आरोग्य व पोषण क्षेत्रात दीर्घकालीन आणि परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

🌱 प्रत्येक माता, बालक आणि किशोरीपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवून निरोगी व सशक्त नंदुरबार घडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

#Mission150#Nandurbar#माताआरोग्य#बालआरोग्य#NutritionMission#HighBurdenVillages#PublicHealth#WomenAndChildDevelopment#RBSK#TribalHealth#HealthyNandurbar#CommunityHealth#DataDrivenGovernance#IntegratedDevelopment#कुपोषणमुक्तनंदुरबार