Home आरोग्य पोलीस दलामध्ये कार्यरत असताना हिमांशू रॉय यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात केलेले कार्य...

पोलीस दलामध्ये कार्यरत असताना हिमांशू रॉय यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात केलेले कार्य सर्वपरिचित आहे

0
Himanshu Roy's contributions to the field of national security during his tenure in the police force are well known.

हिमांशू रॉय फाउंडेशनच्या वतीने संशोधित केलेले कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळातील निदानासाठी ‘हिमांशू रॉय कॅन्सर डिटेक्शन किट’ कर्करोगातील उपचाराकरिता निश्चितच महत्त्वाचे ठरत आहे. हे कार्य त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्कारामुळे समाजाच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरवच होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित ‘द हिमांशू रॉय लिगसी पुरस्कार वितरण कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हिमांशू राय फाउंडेशनच्या संस्थापक भावना रॉय उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गंधर्व संगीत महाविद्यालय आणि डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रात डॉ. झरीर उदवाडिया आणि डॉ. शेखर भोजराज यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील पुरस्कार मरणोपरांत शहीद तुकाराम गोपाल ओंबळे यांना त्यांच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब याला जिवंत पकडण्याच्या अतुलनीय कार्यासाठी देण्यात आला. त्यांची मुलगी वंदना ओंबळे – पटणी यांनी पुरस्कार स्वीकारला.

#हिमांशूरॉय

#कर्करोग