(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र असे ‘ग्रामपंचायत भवन’ असावे आणि जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा तिथून घेता यावा यासाठी ‘ग्रामपंचायत भवन’ ची मागणी जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी केली आहे. यासंदर्भात नुकतीच केंद्रिय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याशी भेट घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा देखील केली. (New Grampanchayat Bhavan at Nandrubar)
जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींच्या आढावा घेण्यासाठी स्वतंत्र ‘ग्रामपंचायत भवन’ असावे म्हणुन पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली येथील कार्यालयात खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी भेट घेतली. आणि याबाबतीत त्यांची सखोल चर्चाही झाली. या भेटीनंतर डॉ. हिनाताई गावित यांनी लवकरच नंदुरबारला ग्राम पंचायत कार्यालयाना परवानगी मिळेल आणि सर्व ग्रामपंचायती जोमाने काम करू शकतील, अशी भावना व्यक्त केली.
![Grampanchayat Bhavan at Nandrubar](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Grampanchayat-Bhavan-Nandrubar-1024x576.png)
नंदुरबार जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या ग्रामपंचायती आणि मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींसाठी कार्यालयांची आवश्यकता आहे. त्यामुळे नव्याने होणार्या या ‘ग्रामपंचायत भवन’मुळे आदिवासी खेड्या पाड्यांपर्यंत योजना आणि सुविधा पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे. जिल्यातल्या लोकांचा शासनाशी आणि शासनाचा लोकांशी संपर्क वाढण्यासाठी या ‘ग्रामपंचायत भवन’ ची मोठी मदत होणार आहे.