वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. विज्ञापित यामध्ये एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलेंडर […]
वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
विज्ञापित
यामध्ये एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय बारा, चार आणि दोन किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलेंडरही आढळून आले.
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
विज्ञापित
Follow Us:

