नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण! सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आदिवासी व अतिदुर्गम भागातील माता व बाल आरोग्य सेवेत क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या ‘ई-आरोग्य धमनी’ या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला आहे.
राजस्थानातील जयपूर येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि राजस्थानचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रम या गटात देशभरातून प्रथम क्रमांक पटकावत नंदुरबारने राष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा रोवला.
‘ई-आरोग्य धमनी’ या अभिनव डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल आरोग्य जनगणना, हेल्थ ॲप, सिकल सेल मिशन, आरोग्य कृती केंद्र आणि एकात्मिक पाठपुरावा प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे गर्भवती माता व बालकांचे अचूक, सातत्यपूर्ण आणि वेळेवर अनुवर्तन शक्य झाले असून, संभाव्य आरोग्यधोके ओळखून तातडीने उपचार उपलब्ध करून देता येत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख बनली आहे.
कुपोषण, माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी ठरलेला हा उपक्रम आज देशासाठी अनुकरणीय आदर्श ठरला आहे. हा राष्ट्रीय सन्मान केवळ एका प्रकल्पाचा नसून संपूर्ण **’टीम नंदुरबार’**च्या समर्पित कार्याचा गौरव आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन!
#NationalEGovernanceAward#ERogyaDhamani#TeamNandurbar#DigitalGovernance#DigitalHealth#PublicHealth#MaternalHealth#ChildHealth#TribalDevelopment#Innovation#GoodGovernance#Nandurbar#Maharashtra#DrMittaliSethi#NamanGoyal#HealthForAll
















