राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या महान परंपरेला पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत असून देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता […]
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित
Organized on the occasion of the 111th Foundation Day of SNDT Women's University, at the hands of Governor Jishnu Dev Varma.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या महान परंपरेला पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत असून देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता त्यात असल्याचा विश्वास राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.

‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ हे संशोधनाचे उद्योगांमध्ये, कल्पनांचे उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर घडविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगत त्यांनी विकसितभारत २०४७ साकार करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अपरिहार्य असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्यासह विविध मान्यवर तसेच माजी विद्यार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.

#महर्षीकर्वे

#SNDT

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: