
प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळून कामाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.ही सेवा सध्या बंद असून या प्रकल्पाचे अंतिम स्थान सर्वेक्षण (फायनल लोकेशन सर्व्हे) पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून २०२६ रोजी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून राज्य शासनाची भूमिका पुन्हा स्पष्ट केली असून, विदर्भातील रेल्वे संपर्क मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक वाटा उचलण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे.















