अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर येथे होणार आल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
विधानपरिषदेत १०१ तास १० मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास १३ मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९०.१४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७८.५७ टक्के इतकी होती.
विधानपरिषदेत ९ विधेयके पूर:स्थापित करण्यात आली आणि ती संमत करण्यात आली. विधानसभेने पारित केलेली १८ विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर ३ विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली. सभागृहात नियम ९७ अन्वये एकूण ४९ प्राप्त सूचना, तर ४८ सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली.













