Home टेक न्युज वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना रायगड मी मराठी प्रतिष्ठानने दिला आधाराचा हात

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना रायगड मी मराठी प्रतिष्ठानने दिला आधाराचा हात

0
Raigad Mi Marathi Pratishthan extended a helping hand to children who have lost their fathers.

मंडणगड(प्रतिनिधी):-आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे वडील. त्यांच्या छत्रछायेत मुलांचे बालपण सुरक्षित, निर्धास्त आणि स्वप्नांनी भरलेले असते. परंतु नियतीच्या कठोर आघातामुळे काही चिमुकल्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र कायमचे हरवते. त्या कोवळ्या वयात त्यांच्या डोळ्यांत असंख्य प्रश्न असतात, तर मनात भविष्याची चिंता. अशा मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभे राहिले आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश लाड यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत कु. साईराज दिनेश राणे आणि कु. खुशी दिनेश राणे (मु. आतले, पो. देव्हारे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी ) या मुलांना दत्तक स्वरूपात स्वीकारले आहे. केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये यासाठी दरवर्षी त्यांना शालेय किट देण्यात येते. प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य दर्शन पवार जबाबदारी स्वीकारून दरवर्षी या मुलांपर्यंत किट पोचवतात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कु. साईराज आणि कु. खुशी राणे यांना किट देण्यात आले यावेळी मुलांची आई, आतले गावचे कु. प्रेम राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.