
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील चरणसेवा उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असून सेवा बजावत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुणे शहरातील उपक्रमाला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना यावेळी श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
#आषाढीवारी२०२६#पंढरपूर#चरणसेवा#पंढरीचीवारी#आषाढी#वारी#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी#CMRF#Wari2026#PandharpurWari















