Home नंदुरबार नंदुरबारमध्ये क्रीडा विकासाला नवी गती!

नंदुरबारमध्ये क्रीडा विकासाला नवी गती!

1
New momentum for sports development in Nandurbar!

(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सुरू असलेल्या बांधकामांची प्रगती, नवीन सुविधा, ‘खेलो इंडिया’ अंतर्गत प्रस्ताव तसेच ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

🏗️ बांधकाम विभागाने सुरू असलेली दुरुस्तीची कामे जुलै अखेर, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जुलैअखेर, तर नवीन वसतिगृह डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त जागेचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यावर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

🏃 खेलो इंडिया योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलासाठी ४०० मीटर धावपट्टी व जलतरण तलाव, तसेच पी.जी. हायस्कूल, धडगाव, अक्कलकुवा, शहादा आणि नवापूर (शिर्वे) येथील क्रीडा सुविधांसाठी एकूण सात प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

💪 जीर्ण झालेल्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती करून वापर करण्यासह ₹७ लाखांच्या विकास अनुदानातून नवीन व्यायाम साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच क्रीडा संकुलातील सुविधा वापराच्या दरांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यावरही चर्चा झाली.

🌱 “प्रत्येक ग्रामपंचायतीत एक क्रीडांगण” या अभिनव उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायती, आदिवासी आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळून १०० क्रीडांगणे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मैदाने ३१ जुलैपर्यंत निश्चित करून १५ ऑगस्ट रोजी माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते निवडक ठिकाणी उद्घाटन करण्याचे नियोजन आहे.

🏅 आधुनिक क्रीडा सुविधा, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी आणि सक्षम क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

#Nandurbar#DrMittaliSethi#SportsDevelopment#KheloIndia#DistrictSportsComplex#FitIndia#RuralSports#YouthEmpowerment#TeamNandurbar#ViksitMaharashtra