शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी; दृष्टीदोषी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करून दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे व आवश्यक उपचार देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नॅशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी; दृष्टीदोषी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे
Eye check-up for school students; visually impaired students to receive free spectacles.

या अभियानाची सुरुवात २० लाख विद्यार्थ्यांच्या तपासणीपासून होणार असून, पुढे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. १८ जिल्ह्यांतील ८०० शाळांमध्ये सुमारे ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. दृष्टीदोषामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, तसेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: