अंगणवाडीतील खिचडी, शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश
राज्यातील अंगणवाडीतील खिचडी तसेच शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत नियमित तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय व खासगी ठिकाणी तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अंगणवाडी व शालेय आहार व्यवस्थेची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.
