शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान,शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद

नंदुरबार(:-शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णाहुती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.
Consecration of idols at the south-facing Hanuman and Shani temple near Shivdham Garden will take place on Friday; a procession will be held on Sunday, followed by *Mahaprasad*.