जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेतर्फे नंदुरबार येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि विविध

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकला सोनवणे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आयकर अधिकारी नरेंद्र खोंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर खोंडे, ज्ञानदीप अकॅडमीचे प्रमोद राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी ललित बोरसे आणि महिला
जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेतर्फे नंदुरबार येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि विविध
A ceremony to felicitate meritorious students and community members who have achieved remarkable success in various fields was held with great enthusiasm in Nandurbar, organized by the District Nabhik Samaj Hitvardhak va Karmachari Sanstha.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकला सोनवणे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आयकर अधिकारी नरेंद्र खोंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर खोंडे, ज्ञानदीप अकॅडमीचे प्रमोद राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी ललित बोरसे आणि महिला जिल्हाध्यक्ष जयश्री निकम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष पंकज भदाणे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या गेल्या दहा वर्षांतील उपक्रमांची माहिती दिली . या सोहळ्यात समाजातील दिवंगत गुलाबराव पवार यांना मरणोत्तर ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, जो त्यांच्या पवार कुटुंबियांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय सैंदाणे यांनी केले आणि आभार संस्थेचे सचिव हिमांशू बोरसे यांनी मानले . हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अरविंद निकम, नितीन मंडलिक, शिवाजी मिस्त्री, छगन भदाणे, सुधीर निकम, नरेंद्र महाले, प्रकाश देवरे यांच्यासह नाभिक समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: