महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा

नंदुरबार:-महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी तालुका जिल्हा नंदुरबार येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक ए बी पटेल व पर्यवेक्षक आर ए पाडवी हे उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून सौ जयश्री पटेल यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा याविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले. संस्कृत दिनाबद्दल सौ मराठे यांनी मार्गदर्शन केले.
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा
Raksha Bandhan, Narali Purnima, and Sanskrit Day were celebrated with great enthusiasm at Mahatma Gandhi Vidyalaya and Junior College, Ashti.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेतील बागेमध्ये असलेल्या वृक्षाला सुरक्षिततेची राखी बांधून निसर्गाप्रती निस्सिम प्रेम व्यक्त केले. मानवाचा खरा पालक आणि खरा संरक्षक हा निसर्गच असतो याची जाणीव लक्षात घेऊन विद्यार्थिनींनी स्वप्रेरणेने वृक्षाला राख्या बांधल्या. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सौ तनुजा मराठे यांनी केले कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: