
राज्यपालांनी संग्रहालयाच्या कार्याचे कौतुक केले तसेच देशातील नामशेष होत चाललेल्या पारंपरिक कलांचे जतन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.संग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांनी राज्यपालांना संग्रहालयाचा इतिहास, वाटचाल आणि कार्याची माहिती दिली. त्यांनंतर त्यांनी संग्रहालयातील अन्य क्युरेटर्ससह प्राचीन भारत व विश्व दालन, शिल्पकला दालन, हिमालयीन कला दालन तसेच लघुचित्रे आणि वस्त्र संग्रहालय दाखवले















