Home कला-साहित्य कविवर्य ना.धों.महानोर यांच्यावर पळसखेड येथे उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कविवर्य ना.धों.महानोर यांच्यावर पळसखेड येथे उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

25
N D Mahanor
N D Mahanor

(जळगाव) निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात पळसखेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील त्यांच्या शेतात ‘सुलोचना बाग’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निसर्गकवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

सुप्रसिद्ध कवीवर्य पद्मश्री महानोर दादा यांचे पुणे येथे दि. ३ ऑगस्ट रोजी औषधोपचार दरम्यान रुबी  हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांचे पश्चात दोन मुलं, तीन मुली, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना महानोर यांचे दुःखद निधन झाले होते.

N D Mahanor
N D Mahanor