Home सरकारी योजना राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर...

राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार

0
The Air India building is set to be renovated to facilitate faster and more streamlined operations for various state government departments.

मुख्य सचिव यांनी याबाबत संबंधितांची बैठक घेऊन विविध शासकीय विभागांतील कोणत्या विभागांचे स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकरण इमारतीत करणे हे प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल हे पाहावे. या ठिकाणी प्रशासकीय कार्यपद्धती ही सुलभ आणि लोकाभिमुख होईल यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, विकास चंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (विशेष चौकशी अधिकारी) पंकज कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके तसेच अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी, वास्तुविशारद उपस्थित होते. संभाव्य नूतनीकरण आराखड्यांचे सादरीकरण संबंधित वास्तुविशारदांद्वारे करण्यात आले.

#एअरइंडियाइमारत