
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित,वैभव विद्यालय, वैजाली. ता. शहादा जि. नंदुरबार वैभव विद्यालय वैजाली येथे नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी चेअरमन, माजी आमदार, स्व. बटेसिंह रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. माळी यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व विद्यार्थ्यांना दादासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक,
राजकीय, कार्याची माहिती दिली. दादासाहेबांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यालयातर्फे दादासाहेबांच्या जयंती निमित्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, स्कूल
बॅगचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जी पी पाटील, पी एस पाटील, ए आर शेख, श्रीमती जयस्वाल एस ओ श्रीमती एस आर पाटील, अमोल चौधरी, एच आर भोई, एस के पाटील, एस एस शिंपी, एस बी परदेशी, ए. एस परदेशी, एम व्ही मिस्त्री, आर बी पवार, व्ही. ए पाटील, जी एस पाटील उपस्थित होते.















