तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच मीरा रहासे होत्या. तर प्रमुख अतिथी सखुबाई मगन पवार होत्या. ज्यांनी गेल्या वीस वर्षांपासून गावातील गर्भवती महिलाची सुखरूप प्रसूती करून त्यांना नवजीवन देण्याचे काम अगदी निः स्वार्थपने व शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय केले. म्हणून आजचे ध्वजारोहण सखुबाई मगन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायततर्फे सरपंच मीरा रहासे यांच्या हस्ते सखुबाई यांचा
साडी,चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक उमेश पाटील यांनी सखुबाई यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
त्यानंतर राहुल साळुंखे यांनी शासनाच्या आदेशानुसार
संगीतमय कवायतीचे विविध प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपले मनोगत व्यक्त करत स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले.
त्यानंतर मागील वर्षी स्कॉलरशिप परीक्षा मध्ये पास
झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच ट्रायबल
टॅलेंट सर्च फाउंडेशन आयोजक अजय खर्डे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील दोन विद्यार्थिनीनी जिल्ह्यात द्वितीय
क्रमांकाने पास झाल्या. यामुळे या सर्व विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते
प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार विलास मगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला पालक व गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि
गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उमेश पाटील, संदीप मोरे, तुकाराम भील, विलास पाडवी, सुदाम जांभोरे, पंकज खेडकर, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.
















