Home टेक न्युज ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा...

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध

0
Benefits of the Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana are available at the level of Primary Health Centres in rural areas.

राज्यात नव्याने उभारण्यात आलेल्या १२४ आरोग्य संस्थांचे तसेच विविध रुग्णालये व आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दृष्टीने संस्मरणीय क्षण आहे. वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काही ठिकाणी आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हत्या. अशा संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.