(तळोदा) तळोदा तालुक्यातील विद्यागौरव स्कूल ज्युनियर कॉलेज,आमलाड येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. (Nandurbar News)
विद्यागौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम
विद्यागौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल येथे रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनविणे, तसेच चिमुकल्या बहिणींनी आपल्या वर्गातील भावांना स्वतः तयार केलेल्या राख्या बंधल्या व भावांनी आपल्या बहिणींना कॅडबरी, पेन इत्यादी भेट म्हणून भेटवस्तू दिल्या. ( नंदुरबार न्युज )
![Rakshabandhan at Aamlad Taloda](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Rakshabandhan-at-School-Aamlad-Taloda-1024x576.jpg)
स्काऊट-गाईडच्या विद्यार्थिनींचा झाडांना राखी बांधून वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प
तसेच स्काऊट गाईड शिक्षक पुलायन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट-गाईडच्या विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधून वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प केला. प्रास्तविक व सूत्रसंचालन शिक्षिका प्रीती बुनकर यांनी केले. कार्यक्रमाला ललित पाठक सर, विश्वास पवार सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणीच्या पायांवर डोके टेकून आशिर्वाद घेतले. चिमुकल्यांनी बांधलेल्या राख्या आकर्षक ठरल्या.