(नंदुरबार)
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील व लोकाभिमुख मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आयोजित भव्य आरोग्य शिबिराला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट दिली.
नंदुरबार येथील प्रसिद्ध मानाचे व नवसाला पावणारे दादा गणपती व बाबा गणपती मंदिर परिसरात आज एक वेगळ्याच स्वरूपाचा उत्सव पाहायला मिळाला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दादा गणपती व बाबा गणपतीच्या आरतीस उपस्थित राहून भक्तिभावाने दर्शन घेतले.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, ईसीजी, रक्त तपासणी, औषध वितरण, तसेच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मा. जिल्हाधिकारी यांनी शिबिराची पाहणी करत सर्व सेवा व सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत होती. यासोबत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार धामणे, तसेच दादा गणपती व बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद लाभत असून इतर भागांतील शिबिरांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अधिष्ठाता, जिल्हा समन्वयक डॉ. योगेश सरताळे, तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, धर्मदाय रुग्णालये यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

गणेशोत्सवाचा सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू जपत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हे अभियान आरोग्यसेवांचा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
#नंदुरबार#गणेशोत्सव२०२५#दादा_गणपती#बाबा_गणपती#आरोग्यजागरूकता#सामाजिकउपक्रम#GaneshFestival2025#NandurbarNews
















