भालेर MIDC मध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांसोबत जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत MIDC कर्मचारी, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी तसेच भालेर MIDC परिसरात गुंतवणूक केलेले उद्योजक सहभागी झाले होते.
बैठकीत उद्योगविकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
मुख्यतः खालील विषयांवर भर देण्यात आला:
⦁ उद्योग सुरू करण्यात झालेल्या विलंबामुळे आकारण्यात आलेल्या दंडाबाबत पुनर्विचार
⦁ भालेर MIDC साठी अखंडित वीज आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करणे
⦁ जिल्ह्यासाठी विशेष निर्यात धोरण तयार करणे
महत्त्वाची बाब म्हणजे, मौजे पळाशी सबस्टेशन येथील 5 MVA रोहित्र सुरु करण्यास परवानगी मिळाली असून विजेची समस्या लवकरच सुटणार आहे.
प्रशासनाच्या नियोजनानुसार, १५ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून भालेर MIDC पूर्णपणे कार्यरत होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
कृषी विभागाकडून पाच उत्पादने निर्यातीसाठी सुचविण्यात आली असून, जिल्हा उद्योग विभाग या उत्पादनांवर सखोल अभ्यास करून निर्यात क्षेत्रात जिल्ह्याला नवे दालन खुलं करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
ही बैठक जिल्ह्यातील औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे.
भालेर MIDC पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर, नंदुरबार जिल्हा नव्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
#Nandurbar#BhahlerMIDC#IndustrialGrowth#Investment#ExportPolicy#DistrictIndustryCentre#CollectorOfficeNandurbar#उद्योगविकास#नंदुरबार
















