Home नंदुरबार जिल्हा इस्त्रायलमध्ये रोजगाराची संधी: जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

इस्त्रायलमध्ये रोजगाराची संधी: जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

13
employment-opportunities-in-israel-golden-opportunity-for-candidates-from-districts

(नंदुरबार) शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना इस्त्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे नूतनीकरण बांधकाम (Renovation Construction) क्षेत्रात एकूण 2 हजार 600 पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असून प्लास्टरिंग काम (Plastering work), सिरॅमिक टाइलिंग (Ceramic Tiling), ड्रायवॉल काम (Drywall Work) व मेसन/ गवंडी काम ( Mason) या पदांसाठी भरती होणार आहे.

पात्रतेचे निकष

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खालील निकष आवश्यक आहेत.

• शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण असावे.

• वयोमर्यादा: 25 ते 50 वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.

• अनुभव: उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी विभागाच्या https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळावरील लेटेस जॉब (Latest Jobs) या पर्यायाद्वारे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध होईल तसेच, इच्छुक उमेदवार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात उपलब्ध असलेल्या बारकोडवर स्कॅन करून गुगल फॉर्म सादर करू शकतात.

या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.