Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

3
Jijau Maa Saheb, Swami Vivekananda Jayanti celebrated at the District Collector's Office

अमरावती: जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, दुर्गा देवळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, माहिती तंत्रज्ञान अधिकारी मनिषकुमार, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चाफले आदी उपस्थित होते. उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.