
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासह राज्यात विकासाचे आणि गृहनिर्माणाचे विविध प्रकल्प सुरू असून यात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यास त्यांनी तत्वतः मान्यता दिली.
म्हाडाचे राज्यातील विविध प्रकल्प आणि योजनांच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.















