Home अक्कलकुवा अक्कलकुवा तालुक्यातील मंजूर वनपट्टे शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावेत, यासाठी 21 ऑगस्ट रोजी...

अक्कलकुवा तालुक्यातील मंजूर वनपट्टे शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावेत, यासाठी 21 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

1
A one-day sit-in protest will be held in front of the Tehsil office on August 21st, demanding the distribution of approved forest land rights (forest land titles) to farmers in Akkalkuwa Taluka.

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील मंजूर वनपट्टे शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी येत्या 21 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार, असल्याचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, सरपंच भूपेंद्र पाडवी यांनी तहसीलदार विनायक घुमरे यांना सादर केले.
अक्कलकुवा तालुक्यातील मंजूर वनदावे शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावेत यासाठी वेळोवेळी मागणी करूनही हे वनदाव्य शेतकऱ्यांना वाटप होत नसल्याने मंजूर वनदाव्यांचे त्वरित वाटप करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी येत्या 21 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, या आशयाचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदार यांना देण्यात आले  निवेदनावर शेतकऱ्यांच्या साक्षर आहेत या आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले आहे, यावेळी वन अतिक्रमण धारकांच्या विविध समस्यांवर चर्चा देखील करण्यात आली.