मौजे मंदाना, ता. शहादा, जि. नंदुरबार
महाराष्ट्र शासनाच्या ‘१० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत आज दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यक्षेत्र मंदाना ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात मंदाना गावातील ग्रामस्थ तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनासाठी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबारचे विभागीय वन अधिकारी मा. डॉ. मकरंद गुजर साहेब, सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण साहेब, तसेच वनक्षेत्रपाल श्री. रामकृष्ण लामगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी वनपाल ईश्वर चव्हाण, अश्विनी चव्हाण, साधना वाडीले, तसेच वनरक्षक भूपेश तांबोळी, गंगोत्री गवळे, दिपाली पाटील यांनी सक्रिय सहभाग दिला.
मौजे मंदाना बांबू लाभार्थी व वृक्षलागवड तपशील:
⦁ धैर्यशील मोरे – २०० बांबू रोपे
⦁ बाळा देवरे – २०० बांबू रोपे
⦁ किशोर दिलीप पाटील – २०० बांबू रोपे
⦁ दिनेश उदयसिंग चव्हाण – २०० बांबू रोपे
अशा प्रकारे एकूण ८०० बांबू रोपांची लागवड ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आली.
या लोकसहभागातून पार पडलेल्या उपक्रमामुळे केवळ हरित गावाचे स्वप्न साकार होत नाही, तर पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा दृढ संकल्पही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ‘हरित महाराष्ट्र या ध्येयाकडे जाणाऱ्या या प्रयत्नाला स्थानिक समुदायाचे सहकार्य हेच मोठे बळ ठरले आहे.
#१०कोटीवृक्षलागवड#हरितमहाराष्ट्र#पर्यावरणसंवर्धन#nandurbar#श्रमदान#sustainabledevelopment#GreenInitiative#socialforestry#bambooplantation#communityparticipation