
तहसील कार्यालय, नवापूर येथे आज मा. श्री. शिरीषकुमार नाईक, अध्यक्ष, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रीय समिती तथा आमदार, नवापूर विधानसभा मतदारसंघ** यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – नवापूर विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न झाली.
बैठकीत नवापूर तालुक्यातील **तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त 26 कामांना मंजुरीदेण्यात आली असून संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले.
यावेळी मा. अध्यक्षांनी संबंधित विभागांना शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कामे उच्च दर्जाची, गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या** सूचना दिल्या.
तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस श्री. कापसे , उपविभागीय अधिकारी, नंदुरबार, शेतकरी प्रतिनिधी, सर्व तालुकास्तरीय अधिकारी तसेच क्षेत्रीय समितीचे सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी सुकर वाहतूक, शेतीमालाची जलद ने-आण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, मंजूर कामांच्या माध्यमातून नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.
#मुख्यमंत्री_बळीराजा_शेत_पाणंद_रस्ते_योजना#नवापूर#शेतकरीहित#ग्रामीणविकास#महाराष्ट्रशासन#Nandurbar#FarmRoads#Infrastructure#Agriculture#Development















