Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना जप्त करण्यात आलेल्या...

नंदुरबार तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव

0
Auction of vehicles seized while engaged in unauthorized minor mineral mining and transportation in Nandurbar taluka

नंदुरबार येथे होणार असल्याची माहिती नंदुरबारचे तहसिलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

लिलावासाठी तीन वाहने उपलब्ध आहेत, ज्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचेकडील मुल्यांकन (Upset Price) खालीलप्रमाणे आहे:

• ट्रक (वाहन क्रमांक MH-20-GC-3594): या वाहनाचे मुल्यांकन रु. ४४,४१,०००/- आहे.

• JCB (वाहन क्रमांक MH-41-T-1540): या वाहनाचे मुल्यांकन रु. ११,५०,०००/- आहे.

• डंपर (वाहन क्रमांक MH-15-JC-6799): या वाहनाचे मुल्यांकन रु. ४५,००,०००/- आहे.

वाहन मालकांना दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींनुसार सदर वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून हा लिलाव करण्यात येत आहे .

नंदुरबार तालुक्यातील सर्व इच्छुक नागरिकांनी या लिलावात उपस्थित राहावे, असेही आवाहन तहसीलदार श्री. पवार यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .