Home अक्कलकुवा वन्यप्राणी हल्ल्यात नुकसान भरपाई – अक्कलकुवा वनपरिक्षेत्र कार्यालयाची माहिती

वन्यप्राणी हल्ल्यात नुकसान भरपाई – अक्कलकुवा वनपरिक्षेत्र कार्यालयाची माहिती

1
Compensation for damage caused by wild animal attacks – Information from Akkalkuwa Forest Range Office

अक्कलकुवा रेंज वनविभागामार्फत वन्यप्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सातत्याने राबवली जात आहे. वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये पशुधन किंवा माणसाचे नुकसान झाल्यास, शासन नियमानुसार नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

📌 नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करावा?

वन्यप्राणी हल्ल्याची घटना घडल्यावर ४८ तासांच्या आत पुढीलप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे:

⦁ ऑनलाईन अर्ज: वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahaforest.gov.in नोंदणी करून अर्ज सादर करावा.

⦁ लेखी अर्ज: संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयात सविस्तर माहिती देऊन अर्ज सादर करावा.

सुरक्षिततेसाठी नागरिकांना सूचना:

वन्यप्राणी हल्ले टाळण्यासाठी खालील काळजी घेणे अत्यावश्यक आहे:

✅ वन्यप्राणी क्षेत्रात एकट्याने फिरू नये.

✅ शेतीची कामे सामूहिक रितीने करावी.

✅ लहान मुलांना एकटे सोडू नये.

✅ घराच्या परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था ठेवावी.

✅ घराजवळ सांडकचरा टाकू नये, कारण त्यावर भटक्या कुत्र्या-डुकरांचा वावर होऊन बिबट्या यासारख्या प्राण्यांचा आकर्षण होऊ शकते.

✅ शेतातून किंवा जंगलातून जाताना आवाज करत जा – जसे की घुंगराची काठी किंवा मोबाईलवर गाणी वाजवत जाणे. यामुळे वन्यप्राणी दूर राहतात आणि थेट संघर्ष टाळता येतो.

नुकसानीची प्रकरणे:

⦁ पशुधन मृत्यू / जखम – नुकसान भरपाईचे प्रावधान

⦁ मानवी मृत्यू / जखम – विशेष भरपाई रक्कम

अक्कलकुवा वनपरिक्षेत्र अंतर्गत अशा घटनांवर वेळीच उपाययोजना व कार्यवाहीसाठी वनविभाग सज्ज आहे.

🛡 नागरिकांनी सहकार्य करावे, सतर्क रहावे आणि वेळेत अर्ज करून नुकसान भरपाईचा लाभ घ्यावा.

#वनविभाग#wildlifecompensation#AkkalkuwaForestRange#nandurbar#वन्यप्राणीहल्ला#सावधगिरीहाचशहाणपणाचा#forestawareness#वनसंवर्धन